नमस्कार 🙏
मी श्रीमती अस्मिता शरद देव, ॐकार संस्कार केंद्राची संस्थापिका आणि संचालिका. १९९८ मध्ये स्थापन झालेल्या ह्या केंद्रात संपूर्ण स्वास्थ्यासाठी ॐकार उपासना, बाल संस्कार वर्ग, पाणिनीय / परसवर्ण पध्दतीने श्रीगणपति अथर्वशीर्ष पठण वर्ग, श्रीसूक्त पठण वर्ग, श्री लक्ष्मीमातेचे संक्षिप्त पूजन इत्यादि वर्ग घेतले जातात. गेल्या १५ महिन्यात कोरोनाच्या संकटामुळे आम्ही हे सर्व वर्ग गुगल मीटद्वारा ॲानलाइन घेतो. ह्या वर्गांना महाराष्ट्रातील कानाकोप-यातून, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश; तसेच अमेरिका, हॅांगकॅांग, दुबई, आयर्लंड इत्यादि ठिकाणचे लोक सहभागी होतात.
Youtube Link -
https://youtu.be/-XK3IZwe85o