मस्कार 🙏 ॐकार संस्कार केंद्राने संक्रांतिनिमित्त सादर केलेला सूर्यपूजन ह्या व्हीडिओ - चाक्षुषोपनिषद
Youtube Link -
https://youtu.be/YaXE2RNu8Ng
आज सादर करत आहोत सूर्यपूजनाचा दुसरा चौथा - चाक्षुषोपनिषद.
🙏 सूर्यनारायण हे एकच देव असे आहेत जे आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसतात. सूर्यनारायण हे जगाचे नेत्र आहेत. उष्णता, प्रकाश अन् ऊर्जा देणा-या ह्या सूर्याची प्रार्थना ऋषिंनी उपनिषदामधे केली आहे. नेत्ररोग निवारण करण्यासाठी, नेत्रज्योतिला तेज मिळण्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी ऋषिंनी चाक्षुषोपनिषद सांगितलं आहे आणि दूरदृष्टी आणि दिव्य दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून चक्षुष्मती विद्या स्तोत्र सांगितलं आहे.
ॐकार संस्कार केंद्राने सादर केलेल्या ह्या व्हीडिओमधे मी ह्या दोन्ही स्तोत्रांचा विधि सांगितला आहे, पठण केलं आहे, एका स्तोत्राचा अर्थही सांगितला आहे. ही दोन्ही स्तोत्र रोज ऐका, विशेष करून रविवार, सप्तमी,दर महिन्याची संक्रांत, उत्तरायण प्रारंभ, रथसप्तमी ह्या विशेष दिवशी तर जरूर ऐका, त्यामुळे होणा-या लाभाचा अनुभव घ्या.
तुम्हाला आवडलं तर like, comment and subscribe जरूर करा