नमस्कार 🙏
ॐकार संस्कार केंद्र सादर करीत आहे सूर्य पूजा - Soorya Pooja
YouTube Link - https://youtu.be/Au9gBR0ybUI
भगवान सूर्य हे साक्षात दृष्टीला दिसणारे देव आहेत. सूर्यदेव हे जगाचे नेत्र आहेत. सूर्यदेवाचा महिमा अपार आहे, अगाध आहे. आरोग्यं भास्करादिच्छेत् ह्या उक्तीप्रमाणे सूर्यदेवांकडे आरोग्याची प्रार्थना करावी. सूर्यकिरणात जेवढी रोगनाशक शक्ती असते तितकी दुस-या कोणत्याही पदार्थात नसते.
सूर्योपासनेने काय साधत नाही ? सर्व नेत्ररोग, त्वचारोग दूर होतात. अंतर्बाह्य तेजाची प्राप्ति होते. मन:शान्ति मिळते. काळज्या, तणाव, कटकटी, चिडचिड, सर्व त-हेची छोटी मोठी दु:खे सूर्योपासनेने नाहीशी होतात.
धनदौलत, धान्यसमृध्दी, वस्त्रवैभव, संतानसौख्य या सर्वांची प्राप्ति होते. खरं तर सूर्योपासना नित्यनेमाने करायला हवी. पण विशेष दिवस म्हणजे प्रत्येक आठवड्यातला रविवार, तिथिंमधली सप्तमी, दर महिन्यातली संक्रांत, अन् वर्षातले तीन महत्वाचे दिवस म्हणजे मकरसंक्रांत, उत्तरायण प्रारंभ आणि रथसप्तमी.
त्यामधला महत्वाचा दिवस मकरसंक्रांत १४ जानेवारी २०२२ रोजी येत आहे. त्यानिमित्त ॐकार संस्कार केंद्रातर्फे ह्या विशेष पवित्र दिवशी करण्यासाठी सूर्यपूजा सांगत आहे. त्याचा जरूर लाभ घ्या. ऐका, बघा, सूर्यपूजन करून त्याचे लाभ प्राप्त करून घ्या.
ह्या वर्षी मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी २.२८ ते संध्याकाळी ६.१९ ह्या वेळात असल्यामुळे ही पूजा संक्रांतीच्या दिवशी ह्याच वेळात करावी.
======
सूर्योपासना - भाग १
संकल्पासहित षोडशोपचार सूर्यपूजन,
भावार्थासहित सूर्योपनिषद ,
आरती.
======
नमस्कार 🙏 मी श्रीमती अस्मिता शरद देव, ॐकार संस्कार केंद्राची संस्थापिका आणि संचालिका. १९९८ मध्ये स्थापन झालेल्या ह्या केंद्रात संपूर्ण स्वास्थ्यासाठी ॐकार उपासना, बाल संस्कार वर्ग, पाणिनीय / परसवर्ण पध्दतीने श्रीगणपति अथर्वशीर्ष पठण वर्ग, श्रीसूक्त पठण वर्ग, श्री लक्ष्मीमातेचे संक्षिप्त पूजन इत्यादि वर्ग घेतले जातात. गेल्या १५ महिन्यात कोरोनाच्या संकटामुळे आम्ही हे सर्व वर्ग गुगल मीटद्वारा ॲानलाइन घेतो. ह्या वर्गांना महाराष्ट्रातील कानाकोप-यातून, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश; तसेच अमेरिका, हॅांगकॅांग, दुबई, आयर्लंड इत्यादि ठिकाणचे लोक सहभागी होतात.
======
We have students / participants from India 🇮🇳 Mumbai, Thane, Pune, Aurangabad, Nasik, Indore, Gurudaspur, Ahmednagar, Dhule, Nagpur, Hyderabad, Bengaluru, Vijaypura, Jalgaon, Ratnagiri, Surat, Baroda and many cities / towns International Dubai UAE 🇦🇪, Oman 🇴🇲, USA 🇺🇸, Hong Kong 🇭🇰, United Kingdom 🇬🇧, Ireland 🇮🇪, Qatar 🇶🇦 , Sweden 🇸🇪, Australia 🇸🇪, Thailand 🇹🇭
======
ऐका तर मग अन् like, share and subscribe करा म्हणजे अनेकांना ह्याचा लाभ घेता येईल
=======